नोव्हेंबर २०१२ पासून हवेत न झेपावलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या परावर्तीत किंगफिशर एअर लाईन्सचे मुख्य अधिकारी संजय अग्रवाल यांना वेतनाच्या थकबाकी पोटीचे चार कोटी मिळाले आहेत. हे वेतन आíथक वर्ष २०१२-१३ साठीचे आहे. या रक्कमेत ग्रँच्युटी व शिल्लक रजेच्या पोटी मिळालेल्या रजेचा अंतर्भाव नाही.
ग्रँच्युटी व शिल्लक रजेच्या पोटी देय रक्कम ही संपूर्ण कंपनीतील कर्मचारीवर्गासाठी असते या कारणाने एका कर्मचारयाला देय रक्कम वेगळी करता येणार नाही असे कंपनीने आपल्या वार्षकि अहवालात म्हटले आहे. हा आहवाल कंपनीच्या समभाग धारकांना नुकताच प्राप्त झाला आहे. कंपनीने २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षकि सर्वसाधारण सभा बोलावली आहे. कंपनीने चार कर्मचाऱ्यांना वार्षकि १ कोटीहून अधिक वेतन दिले असून ४४ कर्मचारयांना पाच लाखाहून अधिक वेतन दिले आहे. या वार्षकि अहवालात कंपनीच्या वेतना वरील खर्चात ४८% घट होऊन ३४९ कोटींवर आला आहे कर्मचारयांची संख्या ५,६९६ वरून कमी होऊन २,८५१ झाली आहे. जे कर्मचारी नोकरी सोडून गेले त्यांना देय असलेली ७.२ कोटीची रक्कम सहा महिन्याहून अधिक काळा साठी देय असलेल्या रकान्यात अंतर्भाव केला आहे.
उड्डाणे बंद करण्याला कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करणारया व्यवस्थापानाने २०उड्डाणे चालविण्या पुरता कर्मचारी वर्ग अजूनही आपल्या पटावर असल्याचे म्हटले आहे. जेव्हा नागरी हवाई वाहतुक मंत्रालय उड्डाणाकरीता परवानगी देईल तेव्हा अधिक कर्मचारी भारती करण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे.
कंपनीचा संचित तोटा मार्च २०१३ रोजी १६,००० कोटीवर पोहचला असून एकूण दीर्घ मुदतीचे कर्ज ६,९०० कोटी तर अल्प मुदतीचे कर्ज १,७५० कोटीवर पोहचले आहे. कंपनीला आपल्या कर्जाची पुर्नरचाना होण्याची अपेक्षा असून तसा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले आहे. कंपनी या विषयावरच्या शेवटच्या टप्प्यात असताना बँकांनी कर्ज वसुलीसाठी लावलेला तगादा व माध्यमांनी कंपनीच्या विरोधात आलेल्या बातम्यांनी कंपनीच्या प्रयत्नावर पाणी फिरविले असे म्हटले आहे.