scorecardresearch

‘एलआयसी’ समभागांची आज सूचिबद्धता

बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) २०,५५७ कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री नुकतीच ४ मे ते ९ मे दरम्यान पार पडली.

मुंबई : बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) २०,५५७ कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री नुकतीच ४ मे ते ९ मे दरम्यान पार पडली. मंगळवारी एलआयसीच्या समभागांचे भांडवली बाजारात पदार्पण हे कसे आणि कोणत्या पातळीवर होईल, ही सर्वासाठी उत्सुकतेची बाब आहे. मात्र बाजारातील ताजी पडझड आणि अस्थिर वातावरणाच्या नकारात्मक परिणामामुळे, सूचिबद्धतेलाच मोठा लाभ मिळण्याच्या अपेक्षा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

प्रति समभाग ९४९ रुपये किमतीला एलआयसीचे समभाग प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी व यशस्वी ठरलेल्या बोलीदारांना झाले आहे. एलआयसीचे पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी असलेली प्रति समभाग अनुक्रमे ६० रुपये आणि ४५ रुपयांची सूट पाहाता, त्यांना हा समभाग अनुक्रमे ८८९ रुपये आणि ९०४ रुपयांना मिळविला आहे.

एलआयसीच्या समभागाचे प्रारंभिक विक्रीसाठी निर्धारित मूल्य वाजवी आणि रास्त असूनदेखील बाजारातील अस्थिर वातावरण, अपेक्षेहून कमी जेमतेम तीन पटीने मिळालेला प्रतिसाद आणि एलआयसीच्या ‘आयपीओ’चे मोठे आकारमान या घटकांमुळे सूचिबद्धतेला समभागात जेमतेम वाढ, प्रसंगी घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिलेल्या प्रतिसादामुळे सोमवारी अंतिम दिवशी मुदत संपली तेव्हा २.९५ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळाला होता. तर एलआयसीचे पॉलिसीधारक आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना या भागखरेदीवर प्रति समभाग अनुक्रमे ६० रुपये आणि ४५ रुपये सूट मिळविता येणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Listing lic shares today initial shares capital market curiosity ysh

ताज्या बातम्या