Low Growth major sectors August economy growth rate ysh 95 | Loksatta

प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली!; ऑगस्टमध्ये वाढीचा दर ३.३ टक्क्यांवर

अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात ऑगस्टमध्ये घट नोंदविण्यात आल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली!; ऑगस्टमध्ये वाढीचा दर ३.३ टक्क्यांवर
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात ऑगस्टमध्ये घट नोंदविण्यात आल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध आणि त्या परिणामी पुरवठय़ाच्या बाजूने निर्माण झालेल्या अडचणी आणि मागणीत झालेली घट यामुळे प्रमुख पायाभूत क्षेत्रांची गती मंदावली.

ऑगस्ट महिन्यात एकूण प्रमुख क्षेत्रांचा विकासदर ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीसह ३.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो त्या आधीच्या जुलै महिन्यात ४.५ टक्के नोंदवला गेला होता. तर गेल्या वर्षी याच महिन्यात तो १२.२ टक्के नोंदवण्यात आला होता. प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांपैकी सहा क्षेत्रांनी सरलेल्या ऑगस्ट महिन्यात वाढ दर्शविली. या सहा क्षेत्रांमध्ये कोळसा, तेल शुद्धीकरणावर आधारित उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व वीज निर्मिती यांचा समावेश आहे.

जगभरात मंदीचे वारे वाहत असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था वेगवान मार्गक्रमण करत आहे. मात्र अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हसह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवून महागाई कमी करण्याला दिलेला प्राधान्यक्रम आणि दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला भू-राजकीय संकटामुळे जगातील प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोळसा क्षेत्रातील उत्पादनांत वार्षिक आधारावर ७.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर वीजनिर्मिती क्षेत्राने ०.९ टक्के वाढ साधली. तेल शुद्धीकरणावर आधारित उत्पादने ७ टक्के, सिमेंट आणि पोलाद उत्पादनात अनुक्रमे १.८ टक्के आणि २.२ टक्के वाढ झाली. तर खते उत्पादनात सर्वाधिक ११.९ टक्क्यांची वाढ झाली. या उलट खनिज तेल उत्पादन ३.३ टक्क्यांनी आणि नैसर्गिक वायू उत्पादन ०.९ टक्क्यांनी घसरले.

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर गेल्या आर्थिक वर्षांच्या याच कालावधीशी तुलना करता ९.८ टक्के राहिला आहे. करोनाच्या सावटातून देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्था सावरली असली तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे चढे दर आणि वस्तू-सेवा महागल्याने एकूणच महागाईचा भडका उडाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून वर्षभरात चार वेळा व्याजदर वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘सेन्सेक्स’ची १०१७ अंशांची उसळी; रेपो दरवाढीच्या अपेक्षित मात्रेने घसरणीला लगाम

संबंधित बातम्या

‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संचालक नेमण्याचा अधिकार मिस्त्री कुटुंबीयांना नाही – टाटा
Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावाचा प्रभाव; सोने १ हजाराने महागले तर चांदीचेही दर वाढले!
Gold- Silver Price Today: सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक, दरात झाली वाढ
सेन्सेक्समध्ये ८७ अंशांची घसरण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election Phase 2 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये बजावणार मतदानाचा अधिकार
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा