भागविक्रीला ‘एनएसई’ कडून मंजुरी

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

मुंबई : हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलता अशा आजारांवर उपचारासाठी ‘माधवबाग’ या नावाने चिकित्सालयांसाठी प्रसिद्ध असलेली वैद्य साने आयुर्वेदिक लॅबोरेटरीज लिमिटेड भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. सूक्ष्म-लघू-मध्यम (एसएमई) उद्योगांसाठी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ व्यासपीठावर सूचिबद्धतेसाठी कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या मसुदा प्रस्तावाला (डीआरएचपी) तत्त्वत: मान्यता मिळाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची पारंपरिक आयुर्वेदिक रोगोपचारांशी सांगड आपल्या उपचारांमध्ये ‘माधवबाग’ने ठेवला असून तिच्याकडून विना शस्त्रक्रिया, बहुशाखीय आणि नावीन्यपूर्ण उपचार पद्धती अनुसरली जाते. कंपनीच्या प्रस्तावानुसार, तिचे २७,७१,२०० नवीन समभाग प्रत्येकी ७३ रुपये या दराने जारी केले जाणार आहेत. यातून २०.२३ कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे प्रस्तावित आहे. यातून कंपनीचे अंदाजित मूल्यांकन ४९,००० कोटी (६.७० अब्ज अमेरिकन डॉलर) निश्चित करण्यात आले आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी डॉ. रोहित माधव साने जे कंपनीचे प्रवर्तकदेखील आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागविक्रीतून उभ्या राहिलेल्या भांडवलाचा विनियोग कंपनीच्या ब्रँडिंग व प्रचारासाठी तसेच व्यवसायवृद्धीच्या संधी, नीतीविषयक उपक्रम, भागीदारी, विपणन आणि व्यवसायवृद्धीसाठी करण्याचे प्रस्तावित आहे. ‘माधवबाग’ या नावाखाली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये कंपनी सध्या २७४ चिकित्सालये चालवते. यांपैकी ५२ हे कंपनीच्या स्वमालकीचे तर २२२ फ्रँन्चाईजी धाटणीचे आहेत. याचबरोबर कंपनी खोपोली आणि नागपूर येथे दोन सुसज्ज हृदयरोग प्रतिबंध आणि पुनर्वसन रुग्णालयेदेखील चालविते.