देशातील प्रमुख उत्पादन, निर्मिती क्षेत्रात मेमध्ये १६.८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. प्रमुख आठ क्षेत्रांपैकी नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट, वीजनिर्मिती क्षेत्राने गेल्या महिन्यात सकारात्मक कामगिरी बजावली आहे.

खासगी क्षेत्रातील कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट तसेच वीजनिर्मिती आदींचा प्रमुख क्षेत्रात समावेश होतो. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत, मे २०२० मध्ये हे क्षेत्र उणे २१.४ टक्के होते.

वर्षभरापूर्वीच्या करोना प्रसारानंतरच्या टाळेबंदीचा या क्षेत्रावर झालेला परिणाम यंदा दिसला नाही. चालू वर्षात मार्चमध्ये या क्षेत्राने ११.४ टक्के, तर एप्रिलमध्ये ६०.९ टक्के वाढ नोंदवली आहे.

मे २०२१ मध्ये नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट, वीजनिर्मिती क्षेत्राने सकारात्मक कामगिरी केली. तर कोळसा उत्पादन ६.९ टक्क्याने वाढले.