बाह्य प्रतिकूल घडामोडींचे सावट, वाढती महागाई, रुपयाचे उत्तरोत्तर अवमूल्यन आणि मंदीच्या भीतीने काळवंडलेल्या वातावरणाला भांडवली बाजाराने सोमवारी छेद दिला. सायंकाळी दिवाळीतील मुहूर्ताच्या विशेष व्यवहारात प्रमुख निर्देशांकांनी बहारदार तेजी दर्शवली आणि नव वर्ष (संवत्सर २०७९) हे मंगलदायी चैतन्याचे राहील असा आशावाद जागवला.

भांडवली बाजारातील परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजननिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे सौदे पार पडले. सेन्सेक्स ५२४.५१ अंशांनी झेप घेत व्यवहाराअंती ५९,८३१.६६ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १५४.५० अंशांची कमाई करून १७,७३०.८० वर जाऊन बंद झाला. दोन्ही मुख्य निर्देशांकांनी ०.८८ टक्क्यांची वाढ नोंदवली. एकंदर बाजारात खरेदीचा उत्साह जोरावर होता, परिणामी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मिडकॅप या निर्देशांकांमध्येही अर्धा ते एका टक्क्याची वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सुमारे २,६०२ समभागांचे मूल्य वाढले, त्या तुलनेत ७२७ समभागांत घट झाली तर १५३ समभागांचे मूल्य अपरिवर्तित राहिले. नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक हे निर्देशांकांतील मोठी वाढ साधणारे समभाग होते, तर नुकसान सोसलेल्या समभागांमध्ये हिंदूस्तान युनिलिव्हर, कोटक मिहद्र बँक, एचडीएफसी लाईफ आणि अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश होता.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

उत्सवी रंगत..

  • अमेरिकी बाजारात शुक्रवारच्या व्यवहारातील तेजी, त्या परिणामी जगभरातील भांडवली बाजारातील सकारात्मकताही सोमवारच्या विशेष व्यवहारांसाठी उपकारक ठरली.
  • मागील आठवडाभर भारतीय कंपन्यांच्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा सरस कामगिरीने बाजारात बनत गेलेल्या दिवाळीपूर्व तेजीच्या वातावरणात मुहूर्ताच्या विशेष व्यवहारांनी उत्सवी रंग भरल्याचे दिसून आले.