सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर ‘सेन्सेक्स-निफ्टी’चा विसावा ; रिझव्‍‌र्ह बँक पतधोरणापूर्वी सावधता..

मुंबई : बँकिंग, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नाममात्र घसरणीसह, पण दिवसातील उच्चांकी स्तरावर गुरुवारी बंद झाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी गुरुवारी दिसलेल्या या सावध पवित्र्यामुळे, सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर निर्देशांकांनी काहीसे विसावल्याचे दिसून आले. उच्च चलनवाढ रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची दर-निर्धारण समिती (एमपीसी) शुक्रवारी द्विमासिक पतधोरण जाहीर करणार […]

सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर ‘सेन्सेक्स-निफ्टी’चा विसावा ; रिझव्‍‌र्ह बँक पतधोरणापूर्वी सावधता..
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : बँकिंग, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नाममात्र घसरणीसह, पण दिवसातील उच्चांकी स्तरावर गुरुवारी बंद झाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी गुरुवारी दिसलेल्या या सावध पवित्र्यामुळे, सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर निर्देशांकांनी काहीसे विसावल्याचे दिसून आले.

उच्च चलनवाढ रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची दर-निर्धारण समिती (एमपीसी) शुक्रवारी द्विमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. यातून किमान ३५ आधारिबदूंची वाढ अपेक्षिली जात असली तरी, यापेक्षा अधिक प्रमाणात वाढीचेही विश्लेषकांचे संकेत आहेत. शिवाय रुपयाच्या मूल्यात पुन्हा सुरू झालेल्या घसरणीनेही गुंतवणूकदारांच्या भावना आणि बाजारातील प्रभावित केल्याचे आढळून आले. एकूण तुटपुंज्या व्यापारात. ‘सेन्सेक्स’ ५१.७३ अंशांनी घसरून ५८,२९८.८० वर बंद झाला आणि निफ्टी निर्देशांक ६.१५ अंश घसरून १७,३८२ वर दिवसअखेरीस स्थिरावला.

मुख्य निर्देशांक नरमले असले तरी व्यापक बाजारपेठेत सकारात्मकता होती. मधल्या व तळच्या फळीतील समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप ०.२९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी वाढला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयापूर्वी, व्याजदराबाबत संवेदनशील असणाऱ्या बँकिंग आणि स्थावर मालमत्तासारख्या क्षेत्रांमध्ये समभागांच्या विक्रीतून घसरणीने निर्देशांकांच्या तेजीला खंड पाडला.

दरवाढीच्या प्रमाणावर लक्ष

शुक्रवारी रेपो दरात वाढीचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या बैठकीतून ठरणाऱ्या प्रमाणावर बाजाराचे बारकाईने लक्ष असेल. ३५ ते ५० आधारबिंदूपर्यंतची वाढ होईल, हे बाजाराने गृहितच धरले आहे, मात्र त्यापेक्षा अधिक वाढ नापसंतीचे कारण ठरेल. त्याआधी, चीन-तैवान तणावावरील ताज्या घडामोडींना जागतिक बाजारांची प्रतिक्रिया ही स्थानिक बाजाराचा कल निर्धारीत करेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market update sensex falls 52 points nifty ends at 17382 zws

Next Story
समाजमाध्यमांना वेसण ; स्वतंत्र नियमन व परीक्षण यंत्रणेचे केंद्राचे संकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी