प्रभात डेअरीचा चारा व्यवस्थापनावर भर
प्रभात डेअरीच्या चारा व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत – हायड्रोपोनिक्स, मुरघास व अझोला या तंत्रामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील दुग्धव्यवसायाला हातभार लागला असला तरी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दुग्ध उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे.
प्रभात डेअरीचे सह-कार्यकारी संचालक विवेक निर्मल म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रती लिटर दूध उत्पादन खर्च रु. २४ ते रु. २५ येतो. मात्र दूध रू. २२ प्रती लिटर भावाने विकले जाते. परंतु आता निर्मिती खर्च कमी करून चारा व्यवस्थापनाच्या या नव्या तंत्रज्ञान स्वीकारून नफा वाढवता येईल.
प्रभातने महाराष्ट्रातील ५० वष्रे जुनी व अनुभवी असलेल्या भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बीएआयएफ) सोबत सामंज्यस्य करारकेला आहे. या सामंज्यस्य करारानुसार प्रभातच्या दुग्धउत्पादन प्रकल्पात उच्च दर्जाच्या पशुधनासाठी पशू प्रजनन सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. भारतातील २६ राज्यांमध्ये बीएआयएफच्या माध्यमातून पशू प्रजनन कार्यक्रम राबवले जात आहेत. पशू प्रजनन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मॉडेलदेखील तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा कालावधी ५ वर्षांसाठी असेल. प्रभात डेअरी लि. आणि बायेफमधील भागीदारीचा हेतू म्हणजे बायेफने तयार केलेले उच्च प्रजनन मूल्य असलेले वीर्य तसेच त्याचा अनुभव, ज्ञान प्रभातच्या प्रकल्पांमध्ये उपयोगात आणले जाईल.
महाराष्ट्र सरकारचे पशुधन विषयक प्रजोत्पादक धोरण लक्षात घेऊन त्यात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने या कर्यक्रमामार्फत प्रयत्न करण्यात येतील.
प्रत्येक पशुधन प्रजनन केंद्रात कृत्रिम वीर्य सेवा देण्यात येईल. त्यात प्रभात डेअरी लि.च्या दूध निर्मात्यांना दर्जेदार वीर्य, लसीकरण आणि जंतनाशक पुरविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील विविध भागांमध्ये असणारया प्रभात डेअरीच्या दूध पुरवठादारांना बायेफकडून शेतकऱ्यांनी पुरवली जाईल, असेही निर्मल यांनी सांगितले.
बायेफच्यावतीने प्रभात डेअरीसाठी करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासोबत स्थानिक तरुणांना लसीकरण व जंतनाशकाबद्दल माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात प्रभाततर्फे तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासंदर्भातील प्रत्यक्ष प्रशिक्षण महाराष्ट्रातील बायेफच्या कृषी केंद्रांवर मिळू शकेल.
हा प्रशिक्षण कार्यक्रम जो उमेदवार पूर्ण करेल त्याची निवड कृत्रिम वीर्य तंत्रज्ञ बीएआयएफतर्फे केली जाईल. त्या उमेदवाराला प्रभातच्या पशू प्रजनन केंद्रांमध्ये रोजगार मिळेल.