मुंबई : बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने शुक्रवारी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक (एलटीआय) आणि माइंडट्री या दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. या एकत्रीकरणानंतर नवीन कंपनी ‘एलटीआयमाइंडट्री’ नावाने ओळखली जाईल आणि  जागतिक पातळीवरील दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक आणि माइंडट्री या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समूहाचा भाग आहेत. त्यांच्या एकत्रीकरणानंतर २२ अब्ज डॉलरची मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी अस्तित्वात येणार असून यामुळे जागतिक माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसोबत स्पर्धा करता येणार आहे.

विलीनीकरणानंतर गुंतवणूकदारांना प्रत्येकी दहा रुपया दर्शनी मूल्य असलेल्या माइंडट्रीच्या १०० समभागांच्या बदल्यात एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचे ७३ समभाग देण्यात येणार आहे. एकत्रीकरणानंतर निर्माण होणाऱ्या  ‘एलटीआयमाइंडट्री’मध्ये पालक कंपनी असलेल्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोची ६८.७३ टक्के हिस्सेदारी असेल.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

एल अ‍ॅण्ड टी समूहाने २०१९ मध्ये माइंडट्री कंपनीचे अधिग्रहण केले होती. माइंडट्रीमध्ये एल अ‍ॅण्ड टीची ६१ टक्के हिस्सेदारी आहे. ६ मेच्या समभागाच्या बंद भावानुसार माइंडट्रीचे बाजार भांडवल ५५,६१३ कोटी रुपये आहे. तर, एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेकमध्ये एल अ‍ॅण्ड टीची ७४ टक्के हिस्सेदारी आहे. याचे बाजार भांडवल ८०,५१८ कोटी रुपये आहे. नवीन एकत्रित कंपनीचा महसूल सुमारे ३.५ अब्ज डॉलर असेल, तर बाजार भांडवलानुसार, ‘एलटीआयमाइंडट्री’ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील टेक मिहद्रला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची माहिती-तंत्रज्ञान कंपनी म्हणून स्थान कमावेल.

विलीनीकरणाचा बहार

कंपन्यांच्या विलीनीकरणाचा हंगाम सध्या देशात जोरावर आहे. गेल्या महिन्यात गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाने भारताच्या उद्योग क्षेत्रातील आजवरच्या सर्वात मोठय़ा विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. तसेच मार्च महिन्यात देशातील सिनेमागृहांची साखळी चालविणाऱ्या दोन सर्वात मोठय़ा कंपन्या पीव्हीआर लिमिटेड आणि आयनॉक्स लीझर लिमिटेड यांनी विलीन होण्याचा निर्णय घेऊन, एकूण १,५०० पडद्यांचे जाळे असणारी या क्षेत्रातील महाकाय कंपनीची वाट मोकळी करून दिली. त्याआधी मनोरंजन क्षेत्रातील सोनी पिक्चर्स आणि झी एंटरटेन्मेंट लिमिटेड यांनीही एकत्र येण्याचे ठरविले.

दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याच्या समूहाच्या निरंतर वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे. एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक आणि माइंडट्रीचे व्यवसाय परस्परांना पूरक असल्याने त्यांच्या एकत्रीकरणाचा त्या कंपन्यांना तसेच त्यांचे ग्राहक, गुंतवणूकदार, भागधारक आणि कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल. 

– ए. एम. नाईक, अध्यक्ष, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो