scorecardresearch

तुमचे PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी खाते असेल तर ३१ मार्चपूर्वी हे काम करा, अन्यथा खाते होईल बंद

लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक किमान योगदान जमा करणे महत्त्वाचे आहे.(photo credit: jansatta)

लोकं त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये लोकांना गुंतवणुकीवर परतावा तसेच कर्ज आणि कराचा अधिक लाभ मिळतो. यामध्ये लहान रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

जर तुम्हालाही या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुमचे आधीच या योजनांमध्ये खाते असेल, तर नियमांनुसार, नवीन आर्थिक वर्षात PPF, NPS आणि SSY सारख्या खात्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत किमान काही शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्या या खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षापासून, एखादी व्यक्ती जुन्या/विद्यमान कर प्रणालीची निवड करू शकते आणि विद्यमान कर सवलत आणि कपातीचे फायदे घेऊ शकते. त्याच वेळी, नवीन कर प्रणाली निवडल्यास कर कपात देखील वगळू शकते. तथापि, आपण नवीन कर प्रणालीची निवड केली तरीही, खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक किमान योगदान जमा करणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया कोणत्या योजनेवर, किमान शुल्क काय असेल आणि काय नियम आहेत.

पब्लिक प्रोवायडेड फंड (PPF)

तुम्हाला PPF खात्यात किमान ५०० रुपये ठेवावे लागतील. तुमच्या खात्यात पैसे नसल्यास ३१ मार्च २०२२ या तारखेच्या पूर्वी खात्यात पैसे ठेवा. दुसरीकडे, जर तुम्ही या तारखेपर्यंत तसे करू शकला नाही, तर ५०० रुपयांसोबत तुम्हाला दरवर्षी ५० रुपयांचा दंडही मिळेल. पीपीएफ खातेधारकांनी हेही लक्षात ठेवावे की तुम्ही किमान रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते बंद होते.

एकदा खाते खंडित विभागात गेल्यावर तुम्ही कर्ज, कर बचत सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. तसेच, मुदतपूर्तीपूर्वी, तुम्हाला खाते दुरुस्त करावे लागेल. अन्यथा, मॅच्युरिटी कालावधी संपताच तुमचे खाते बंद केले जाईल. PPF हे खाते १५ वर्षांचा परिपक्वता कालावधी देते.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)

लोकांना पेन्शनचा लाभ देणाऱ्या या योजनेत खातेधारकांना टियर-१ अंतर्गत खात्यात किमान 1000 रुपये ठेवणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, वेळ संपल्यानंतर तुम्ही या खात्यात किमान शिल्लक जमा केल्यास, तुम्हाला पेनॉयसह १०० रुपये भरावे लागतील. यासोबतच पॉइंट ऑफ प्रेझेन्स (पीओपी) शुल्क देखील भरावे लागणार आहे. तरच तुमचे खाते सुरू केले जाईल.

दुसरीकडे, जर एखाद्याचे टियर-२ एनपीएस खाते असेल, ज्यासाठी निधी लॉक-इन करण्याची आवश्यकता नाही, तर टियर-१ खाते प्रक्रिया थांबवण्यासोबत टियर-२ खाते आपोआप बंद केले जाईल. तथापि, टियर-II मध्ये किमान योगदानाची आवश्यकता नसते.

सुकन्या समृद्धी खाते योजना

या योजनेत खाते सक्रिय ठेवण्यासाठी २५० रुपये आवश्यक आहेत. किमान शिल्लक ठेवली नाही तर हे खाते डीफॉल्ट होते. SSY खाते उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी डिफॉल्ट खाते नियमित केले जाऊ शकते. खाते नियमित करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक डिफॉल्टिंग वर्षासाठी ५० रुपयांच्या दंडासह किमान २५० रुपये योगदान द्यावे लागेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minimum balance must require in ppf nps and ssy account before 31 march 2022 otherwise accounts will be closed scsm

ताज्या बातम्या