नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील मंदीची स्थिती आणि देशांतर्गत आघाडीवर वाढत्या व्याजदरामुळे चालू वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के राहण्याचा सुधारित खालावलेला अंदाज आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने शुक्रवारी व्यक्त केला. याआधी या जागतिक संस्थेने देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.७ टक्के दराने वाढेल, असा अंदाज वर्तविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या २०२२ सालातील वाढीच्या अंदाजात कपात मूडीजने दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी, मे महिन्यात वर्तविलेल्या ८.८ टक्के विकासदराचा अंदाज सप्टेंबरमध्ये  कमी करून तो ७.७ टक्क्यांपर्यंत या पतमानांकन संस्थेने खाली आणला होता. २०२३-२४ साठी जागतिक अर्थव्यवस्थेविषयक मांडलेल्या दृष्टिक्षेपानुसार, उच्च महागाई दर आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून केली जाणारी व्याजदर वाढ यामुळे अर्थव्यवस्थेची गती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेची गतीदेखील मंदावल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर उमटले आहे. यामुळे २०२३ मध्ये भारताचा विकासदर ४.८ टक्के, तर २०२४ मध्ये तो पुन्हा वाढून ६.४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा मूडीजने व्यक्त केली आहे. २०२१ या कॅलेंडर वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ८.५ टक्के दराने वाढली होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moody s slashes india s economic growth forecast to 7 percent for 2022 zws
First published on: 12-11-2022 at 04:50 IST