वाढत्या जोखमेने सोन्यातील सुरक्षितता अधिक

परताव्याबाबतही सोने इटीएफ तसेच सोन्यातील गुंतवणूक ही सरस मानली जात आहे.

gold

सोने ईटीएफ, सोन्यातील गुंतवणूक सरस

अलीकडच्या अमेरिकेचे हवाई हल्ले, फ्रान्स आणि जर्मनीतील निवडणुका तसेच दक्षिण कोरियातील तणाव यासारख्या भौगोलिक—राजकीय जोखमीच्या परिस्थितींमुळे सोने या सर्वात सुरक्षित माध्यमाच्या मागणीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परताव्याबाबतही सोने इटीएफ तसेच सोन्यातील गुंतवणूक ही सरस मानली जात आहे.

भौगोलिक—राजकीय अस्थिरतेमध्ये सोन्यातील गुंतवणूक हा एकच सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मूल्याधिष्ठीत गोष्टीची साठवणूक आणि रुपयाची घसरण झाली तरीही ही गुंतवणूक फायदा देते, असे समजले जाते. सोने हे सुरक्षित संपत्तीचे माध्यम समजले जाते आणि बाजारपेठ जेव्हा जोखमीमध्ये असते तेव्हा त्याला मागणी वाढते; तसेच जोखमीची परिस्थिती कमी होते तेव्हा मागणीतही घट होते हे वित्तीय बाजारपेठांची अस्थिरता नोंदवते.

chart

देशांतर्गत सोन्याच्या किंमती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतींवरून ठरतात. इतिहासात, अमेरिकी डॉलरच्या संदर्भातच (एक प्रभावशाली चलन झाल्यापासून, डॉलरच्या शिफारसीनुसार किंमती कमी होऊ शकतात किंवा वाढूही शकतात. किंमतींमधील बदल होत असतात आणि अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह फंडाच्या दरानुसार बदल होत असतात. जर व्याजी दर फारच वाढले तर सोन्याला ते भारी पडू शकतात, परंतु ठेवींवरील उत्पन्नात आतापर्यंत कोणतीही वाढ झालेली नाही आणि घटही झालेली नाही, असे चित्र आहे.

सोन्याचे वाटप हे धोरणात्मक असते. एकूण पोर्टफोलिओच्या ५ ते १० टक्के सोन्याचे भाग हे समभागाबरोबरच्या नकारात्मक संबंधांचे असतात. यामुळे वेगवेगळ्या प्रकारे लाभ पुरवले जातात. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोने इटीएफ हा प्रत्यक्ष सोन्यासाठीचा प्राधान्य असलेला पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व सोन्याच्या इटीएफचे मूल्य अधोरेखित करता सोने ९९.५ टक्के अस्सल असते. यामुळेच इटीएफची कामगिरी बहुतांशी सारखीच असते. काही अडचण उद्भवल्यास किंवा खर्चातील प्रमाणात बदल झाल्यास (इटीएफ परतावे आणि सोन्याच्या परताव्यात बदल झाल्यास) कामगिरीत किरकोळ फरक पडतो. सोन्याचे इटीएफ सांभाळणे तुलनेत सुलभ असते. कारण ते ‘डिमॅटरिअलाइज्ड’ या प्रकारात ते उपलब्ध असते. साठवणुकीच्या किंमतीत बचत करण्यासाठी याची मदत होते आणि यामुळे जोखमही टाळता येते, अशी त्याची वैशिष्टय़े सांगितली जातात. याशिवाय त्याच्या किंमती पारदर्शक असतात आणि एक्सेंजवर नोंदवल्याप्रमाणे ते अधिक ‘लिक्विड’ असते आणि संपत्ती व्यवस्थापन कंपनीकडून सोन्याच्या अस्सलतेची खात्री दिलेली असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: More gold safety due to increasing risks

ताज्या बातम्या