मुंबई : एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचरच्या (नायका) प्रारंभिक समभाग विक्री आधीच्या भागधारकांसाठी गुंतवणूक धारणेचा बंधनकारक कालावधी गुरुवारी संपला असला तरी, कंपनीच्या बक्षीस समभागाच्या खेळीने समभागाला मोठय़ा पडझडीतून सावरले. देशातील सातव्या क्रमांकाच्या अब्जाधीश आणि पहिल्या पिढीतील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका, असा बहुमान मिळविणाऱ्या ‘नायका’च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी विद्यमान भागधारकांचा समभाग धारण करण्याचा सक्तीचा कालावधी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य समभाग विक्रीला रोखण्यासाठी बक्षीस अर्थात बोनस समभागांची घोषणा करून ‘नायका’च्या समभागाला तारले. कोणत्याही कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या वेळी कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्याकडे असलेले समभाग एक वर्षांच्या कालावधीसाठी विक्री करू शकत नाहीत. हा बंधनकारक ‘लॉक-इन’ कालावधी बुधवारी संपुष्टात आला. संस्थापक आणि मुख्याधिकारी फाल्गुनी नायर यांच्या कुटुंबाकडे कंपनीची ५२ टक्के हिस्सेदारी आहे, त्यापैकी ३२.४ टक्के समभाग म्हणजे १.४५ कोटी समभाग लॉक-इनमधून मुक्त झाले आहेत.

गुरुवारच्या सत्रात नायकाचे ६७ टक्के समभाग म्हणजेच ३.१० कोटी समभाग ‘लॉक-इन’मधून मुक्त झाले आहेत. शिवाय हा कालावधी संपत असतानाच, कंपनीच्या व्यवस्थापनाने एकास पाच समभाग बक्षीस देण्याची रेकॉर्ड तारीख १० नोव्हेंबरऐवजी बदलून ११ नोव्हेंबर २०२२ अशी केली. परिणामी गुरुवारी (१० नोव्हेंबर) लक्षणीय संख्येने समभाग विक्रीस मोकळे होऊनही, एक्स बोनस तारीख असल्याने समभागात पडझड झाली नाही. उलट गुरुवारच्या सत्रात नायकाचा समभाग ६.५३ टक्क्यांनी म्हणजेच ११.५३ रुपयांनी वधारून (बोनसपश्चात समभाग मूल्यातील घसरण जमेस धरून) १८८.२५ रुपये पातळीवर स्थिरावला.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड