ओमायक्रॉनचा धोका, सोन्याकडे ओढा

मुंबई : ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूच्या परिणामकारकतेबाबत अद्याप पुरती स्पष्टता नसली तरी त्या संबंधाने गुंतवणूक जगतात चिंतेचे वातावरण दिसून येते. अशा अनिश्चिततेत शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांनी वळण घेतले असून, सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणही या दृष्टीने पथ्यावर पडली आहे. सरलेल्या नोव्हेंबरमध्ये सोनेआधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘गोल्ड ईटीएफ’मधील ६८३ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक याचा प्रत्यय देते.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया’ने (अ‍ॅम्फी) दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरअखेर देशात कार्यरत गोल्ड ईटीएफ फंडातील एकूण गंगाजळी १८,१०४ कोटी रुपयांवर गेली. ऑक्टोबर २०२१ अखेर या गंगाजळीचे प्रमाण १७,३२० कोटी रुपये होते. 

सणोत्सवाच्या हंगामात म्हणजेच सप्टेंबरमध्ये ४४६ कोटी रुपये, तर ऑक्टोबर महिन्यात ३०३ कोटी रुपये गुंतवणुकीचा गोल्ड ईटीएफमध्ये ओघ राहिला असून, नोव्हेंबरमध्ये तो आणखी वाढून ६८३ कोटी रुपयांवर गेला आहे.

 ‘पेपर गोल्ड’ म्हणून प्रचलित असलेल्या गोल्ड ईटीएफमध्ये चालू वर्षात ऑक्टोबरअखेरपर्यंत एकूण ४,५०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. चालू जुलै २०२१ हा एकमेव महिना आहे, जेव्हा या पर्यायातून गुंतवणूकदारांनी ६१.५ कोटी रुपये काढून घेतले. तर याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १४१ कोटी रुपये आणि त्याआधी फेब्रुवारी २०२० मध्ये १९५ कोटी रुपये या योजनेतून काढून घेण्यात आले होते. हे अपवाद वगळता ऑगस्ट २०१९ पासून गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीमधील चढता क्रम कायम आहे.