मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून सलग दुसऱ्या सत्रात रुपयाने नवीन नीचांक नोंदविला. गुरुवारी प्रति डॉलर रुपया आणखी १० पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ७७.७२ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील मोठी घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरबँक परकीय चलन बाजारात गुरुवारच्या सत्रात रुपयाने ७७.७२ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १० पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७७.७२ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ७७.७६ पातळीपर्यंत गडगडले होते. बुधवारच्या सत्रात रुपया १६ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७७.६० पातळीवर स्थिरावला होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New low rupee dollars comparison rupees falling new low reported ysh
First published on: 20-05-2022 at 00:02 IST