महिलांसाठी पारंपरिक सलवार कमीझ आणि कुर्तीची नाममुद्रा असलेल्या ‘कशिश’च्या सदिच्छादूत अभिनेत्री सोहा अली खान महिलावर्गासाठी धो-धो बरसणाऱ्या पावसात ३० टक्के सवलतीची मुसळधार घेऊन आल्या आहेत. शॉपर्स स्टॉप या विक्री दालनशृंखलेच्या या परिधान नाममुद्रेअंतर्गत येत्या १९ जून ते ९ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या विक्री उत्सवात ही सवलत तसेच केल्या गेलेल्या खरेदीवर एक आश्चर्यकारक भेटवस्तूही जिंकता येईल. शॉपर्स स्टॉपच्या सर्व दालनात हा विक्री उत्सव, सवलत, बक्षिसे ग्राहकांना मिळतील.
‘ब्राव्हिआ’ आता १५ हजारातही!
उंची दिवाणखान्यातील शान समजला जाणारा काही लाखांच्या घरातील लोकप्रिय ‘सोनी’ नाममुद्रेचा ब्राव्हिया टीव्ही आता अवघ्या १५ हजारात उपलब्ध होणार आहे. ब्राव्हिया अंतर्गत ३.०४ व ४.०४ लाख रुपयांतील दोन नव्या टीव्ही संचाचे अनावरण अलीकडेच नवी दिल्लीत झाले. त्यावेळी बोलताना छोटय़ा शहरांमधून या ब्रॅण्डला मोठी मागणी असल्याचे मत व्यक्त करून सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केनिचिरो हिबी यांनी लवकरच १५ हजार रुपयातील ब्राव्हिआ टीव्ही सादर करेल, असे नमूद केले. सध्या सोनीच्या एकूण विक्रीत ब्राव्हिआ ब्रॅण्ड ३५ टक्के हिस्सा राखतो. चालू आर्थिक वर्षांत १३ लाख टीव्ही संच विक्रीचे सोनीचे लक्ष्य आहे.
हिरेजडीत आभूषणांच्या घडणावळीवर सूट
त्रिभुवनदास भीमजी झवेरी अर्थात टीबीझेडने यंदाच्या मोसमात दागिन्यांवरील घडणावळीवर शुल्क न आकारण्याचे निश्चित केले आहे. यानुसार महाराष्ट्रातील ‘टीबीझेड-दि ओरिजिनल’ दालनांमध्ये प्रमाणित हिऱ्यांच्या दागिन्यांवर कोणतेही घडणावळ दर लागू होणार नाहीत. कंपनीने सुलभ मासिक हप्त्यावर दागिने उपलब्ध करून देणारी अनोखी योजनाही सादर केली आहे. या अंतर्गत तीन, सहा तसेच १२ महिने कालावधीच्या हप्त्यांवर ग्राहकांना दागिने खरेदी करता येतील. देशातील ७ राज्ये आणि २० शहरांमध्ये असलेल्या कंपनीच्या दालनांमध्ये ही सुविधा आहे. यासाठी आवश्यक असणारे अमेक्स क्रेडिट कार्ड ३० जूनपर्यंत वैध आहे. टीबीझेड हा तयार दागिने क्षेत्रातील तब्बल दीडशे वर्षे जुनी ही विश्वासार्ह नाममुद्रा आहे.