‘फेसबुक’वर न्यायाधीशांवर शिंतोडे फेक!

५,६०० कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्यातील बाजारमंचाच्या प्रमुखांना जामीन दिल्याचा राग गुंतवणूकदारांनी फेसबुक या समाजमाध्यमावर संबंधित न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर काळे फासून व्यक्त केला आहे.

५,६०० कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्यातील बाजारमंचाच्या प्रमुखांना जामीन दिल्याचा राग गुंतवणूकदारांनी फेसबुक या समाजमाध्यमावर संबंधित न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर काळे फासून व्यक्त केला आहे. एका वकिलाने निदर्शनास आणलेल्या या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायबर गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली.
५,६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिडेट’चे (एनएसईएल) मुख्य प्रवर्तक जिग्नेश शहा हे सहा महिने गजाआड होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी गेल्या महिन्यात त्यांना जामीन मंजूर केला. एनएसईएलच्या गुंतवणूकदारांचा मंच असलेल्या ‘एनआयएफ एनएसईएल इन्व्हेस्टर फोरम’चे फेसबुकवर खाते आहे. या खात्यावर न्या. ठिपसे यांचे छायाचित्र टाकून त्यावर काळे करण्यात आल्याचे ज्येष्ठ वकिल नवीन छोमल यांना गेल्या आठवडय़ात निदर्शनास आले.
छायाचित्राखाली ‘अभय ठिपसे हाय हाय’ अशा ‘पोस्ट’ही होत्या. छोमल यांनी अखेर या प्रकरणात वांद्रे कुर्ला संकुल सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली. फेसबुकच्या या खात्यावर गुंतवणूकदार मंचाचे बोधचिन्हही आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nsel fir registered for smearing judges face on facebook

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या