विरार, वसई येथेही ‘ओला’चा विस्तार

ओला हे भारतातील वाहतुकीसाठीचे सगळ्यात लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप आहे

ओला हे भारतातील वाहतुकीसाठीचे सगळ्यात लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप आहे, ओलातर्फे आज मुंबईशेजारील चार ठिकाणी ओला सेवेचा विस्तार केल्याचे जाहीर करण्यात आले. आता यापुढे ओला विरार, वसई, नायगाव आणि नालासोपारा या ठिकाणीही धावेल आणि येथील प्रवाशांना सर्वात योग्य आणि परवडणारया किंमतीती प्राइम ओला आरक्षित करता येणार आहे. तसेच काळीपिवळी टॅक्सी हे वाहतुकीचे पूर्वीचे पर्यायही ओला अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहेत.
चालकाचे तपशील अपफ्रंटवर उपलब्ध, एसओएस बटण, गाडीचे लाइव तपशील आणि ओला मनीचा अमर्यादित वापर अशी या प्रकारातील ओलाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच ओलाच्या ऑटोकनेक्ट वायफाय हा कंपनीच्या नावीन्यपूर्ण लॅबमधून प्रसारित करण्यात आलेला अनुभव आहे, याद्वारे वापरकर्त्यांना आपोआप ओला कॅबच्या वाय-फायशी कनेक्ट होता येणार आहे, यासाठी केवळ एकदाच क्रिडेन्शिअल टाकावा लागणार आहे, हे वैशिष्ट्य ओला प्राइममध्ये उपलब्ध आहे.
ओलाकडे ३५ हजारापेक्षा जास्त कॅब आणि एक लाखांहून ऑटोरिक्शा आहेत आणि या व्यासपीठावरून देशातील १०२ शहरांमध्ये टॅक्सींची नोंदणी झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ola service also in vasai and virar