फॉच्र्युनच्या ‘चाळिशी’त पाच भारतीय
मानाच्या मानल्या जाणाऱ्या फोर्बस्च्या आघाडीच्या श्रीमंतांमध्ये केवळ चार महिला उद्योगिनींना स्थान मिळाले आहे. भारतातून निवडल्या गेलेल्या पहिल्या १०० श्रीमंतांमध्ये असलेल्या चार महिलांची एकूण संपत्ती ९.२ अब्ज डॉलर (एकूण तुलनेत ३ टक्के) गणली गेली आहे.
ओ. पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल, यूएसव्ही फार्माच्या अध्यक्षा लीना तिवारी, हेवल्सचे संस्थापक किंमत राय गुप्ता यांच्या पत्नी विनोद गुप्ता व बेनेट, कॉलमन अ‍ॅण्ड कंपनीच्या इंदू जैन यांचा या क्रमवारीत समावेश आहे.
न्यूयॉर्क : तरुण उद्योजकांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या फॉच्र्युनच्या नामावलीत पाच भारतीयांचा समावेश झाला आहे. फॉच्र्युनने जाहीर केलेल्या जगभरातील ४० वर्षांतील उद्योजकांमध्ये दिव्या सुर्यदेवडा (जीएम असेट मॅनेजमेन्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी; स्थान चौथे), व्ही. नरसिंहन (नोवार्टिस; स्थान सातवे), आनंद स्वामीनाथन (अ‍ॅक्सेंच्युअर्स; स्थान १८वे), अपूर्वा मेहता (इन्स्टाकार्टच्या संस्थापिका; स्थान २३ वे) व रेश्मा सौजानी (गर्ल्स व्हू कोड; स्थान ३९वे) यांची नावे आहेत.

अंबानी सलग नवव्यांदा अग्रस्थानी
एकूण ३४५ अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या पहिल्या १०० श्रीमंतांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सलग नऊ वेळा फोर्बस्च्या यादीत झळकले आहेत. फोर्बस् नियतकालिकानुसार, अंबांनी यांची संपत्ती भारतीय उद्योजकांमध्ये सर्वाधिक, १८.९ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. यादीत संपत्ती कमी झालेल्या १० उद्योजकांमध्ये अर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल यांचेही नाव आहे. फ्लिपकार्टच्या संस्थापकांसह एकूण १२ नवे चेहरे यंदाच्या या यादीत झळकले आहेत.