तरुणाईतील सेल्फीबाबत वेड लक्षात घेत, चिनी हॅण्डसेट निर्मात्या ओप्पो मोबाइलने गुरुवारी मुंबईत उत्तम छायाचित्रणाच्या दृष्टीने निपुण वैशिष्टय़े असलेले ‘एफ’ मालिकेतील सेल्फी फोन प्रस्तुत केले.
भारतीय बाजारपेठेत बस्तान बसविण्यासाठी या नवीन सेल्फी फोनवर कंपनीची बहुतांश मदार असल्याचे ओप्पोचे जागतिक उपाध्यक्ष स्काय ली यांनी याप्रसंगी बोलताना बिनदिक्कत सांगितले. देशातील विक्री जाळ्यात या निमित्ताने कंपनीने विस्तार करून ते ३५,००० विक्री दालनांपर्यंत नेले आहे.
ओप्पोकडून दाखल या नवीन मालिकेत ४जी समर्थ एफ१ फोन हे १५,९९० रुपयांत, तर एफ१ प्लस हे फोन थोडय़ा अधिक किमतीत व उन्नत कॅमेरा कार्यक्षमतेसह एप्रिलमध्ये येऊ घातले आहेत.