सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या देशभरातील पारपत्र वितरण मोहिमेने अवघ्या वर्षभरातच एक कोटी पारपत्र अर्ज स्वीकाराचा अनोखा टप्पा पार केला आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसद्वारे (टीसीएस) जून २०१२ मध्ये देशभरात पारपत्र पुरविण्याच्या सुविधेला सुरुवात झाली. माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाच्या जोरावर ही सेवा अधिक जलद बनली. देशभरात अनेक ठिकाणी पारपत्र सेवा केंद्रे विस्तारित करण्यात आली.
पारपत्र सेवा पद्धतीद्वारे पारपत्र मिळविणारा कोलकत्त्याचा अदनान राजा हा सहा वर्षांचा मुलगा एक कोटीवा मानी ठरला आहे. पारपत्र सेवा प्रकल्पाचे सह सचिव मुकेश परदेशी यांनी कोणत्याही अडथळ्याविन राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे.
१०० अब्ज डॉलरच्या आकारातील १० अब्ज डॉलरच्या टीसीएसद्वारे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे २०१० मध्ये दोन वर्षांत ७७ पारपत्र सेवा केंद्र उभारणीचे उद्दिष्ट राखण्यात आले होते. ते पार करण्यासह गेल्या दोन वर्षांत १६ लघुकेंद्र पारपत्र केंद्रेही सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता एक कोटी पारपत्र अर्ज हाताळणी टीसीएनने यशस्वीरित्या केली आहे.