नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद लिमिटेडने तिचा खाद्यपदार्थाशी संबंधित किरकोळ व्यवसाय ६९० कोटी रुपयांच्या मोबदल्यात, नव्याने संपादित कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडला विकण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. कंपनीचे नाव ‘रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड’वरून ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ असे बदलण्याला देखील संचालक मंडळाने मान्यता दिली.

पतंजली समूहाकडून २०१९ मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्यात आले आहे. रुची सोयाने बाजार मंचाला दिलेल्या माहितीनुसार, पतंजली आयुर्वेदसोबत व्यवसाय हस्तांतरण करार करण्यात आला असून त्याअंतर्गत पतंजली आयुर्वेदचा खाद्यान्न किरकोळ व्यवसाय ६९० कोटी रुपयांना खरेदी केला जाणार आहे. धोरणात्मक निर्णय म्हणून ‘पतंजली’ यापुढे अखाद्य, पारंपरिक औषध निर्माण (आयुर्वेदिक औषधे) आणि आरोग्य निगा व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

खाद्यान्न किरकोळ व्यवसायामध्ये उत्पादन, पॅकेजिंग, लेबिलग आणि किरकोळ विक्रीचा समावेश असून हरिद्वार आणि महाराष्ट्रातील नेवासा, येथे असलेल्या उत्पादन सुविधांची मालकीही रुची सोयाकडे येणार आहे.

 या हस्तांतरण व्यवहारामध्ये पतंजली आयुर्वेदच्या किरकोळ व्यवसायातील कर्मचारी, मालमत्ता (पतंजली नाममुद्रा, व्यापारमुद्रा, आणि स्वामित्व हक्क वगळता), चालू मालमत्ता (कर्ज, वाहने, रोख आणि बँक शिल्लक वगळून), करार, परवाने, वितरण जाळे यांचा समावेश असेल.