नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद लिमिटेडने तिचा खाद्यपदार्थाशी संबंधित किरकोळ व्यवसाय ६९० कोटी रुपयांच्या मोबदल्यात, नव्याने संपादित कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडला विकण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. कंपनीचे नाव ‘रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड’वरून ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ असे बदलण्याला देखील संचालक मंडळाने मान्यता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पतंजली समूहाकडून २०१९ मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्यात आले आहे. रुची सोयाने बाजार मंचाला दिलेल्या माहितीनुसार, पतंजली आयुर्वेदसोबत व्यवसाय हस्तांतरण करार करण्यात आला असून त्याअंतर्गत पतंजली आयुर्वेदचा खाद्यान्न किरकोळ व्यवसाय ६९० कोटी रुपयांना खरेदी केला जाणार आहे. धोरणात्मक निर्णय म्हणून ‘पतंजली’ यापुढे अखाद्य, पारंपरिक औषध निर्माण (आयुर्वेदिक औषधे) आणि आरोग्य निगा व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patanjali ayurved sells food retail business to ruchi soya for rs 690 crore zws
First published on: 19-05-2022 at 03:51 IST