‘पेटीएम’च्या भागविक्रीत दुपटीने भरणा

किरकोळ गुंतवणूकदारसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शाला १.६६ पट अधिक प्रतिसाद, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शाला २.७९ पट अधिक प्रतिसाद मिळाला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या विक्रमी १८,३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीत बुधवारी अखेरच्या दिवसांपर्यंत जवळपास दुप्पट (१.८९ पट) अधिक भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला. भांडवली बाजाराकडून बुधवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कंपनीने प्रारंभिक विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ४.८३ कोटी समभागांच्या तुलनेत ९.१४ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज प्राप्त झाले.

किरकोळ गुंतवणूकदारसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शाला १.६६ पट अधिक प्रतिसाद, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शाला २.७९ पट अधिक प्रतिसाद मिळाला आहे. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शातून  २४ टक्के समभागांना मागणी आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Payment doubled on paytm share sale akp

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प