रिझर्व्ह बँकेची सिटी युनियनसह, तीन बँकांवर दंडात्मक कारवाई

अन्य दोन बँकांविरोधात गुरुवारी कारवाईचा आदेश दिला.

मुंबई : नियत दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याची शिक्षा म्हणून रिझर्व्ह बँकेने सिटी युनियन बँक, तामिलनाड मर्केंटाइल बँक यांनी प्रत्येकी कोटींचा दंड, तर अन्य दोन बँकांविरोधात गुरुवारी कारवाईचा आदेश दिला.

सिटी युनियन या खासगी क्षेत्रातील बँकेने सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमई) उद्योग क्षेत्राला कर्ज वितरण त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज, कृषी क्षेत्राला कर्जपुरवठ्यासंबंधी २०१७ मधील दिशानिर्देशांतील विशिष्ट तरतुदीच्या पालनात हयगय केल्याचे सिद्ध झाल्यानंतर हा १ कोटी रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे. तर तामिलनाड मर्केंटाइल बँकेने सायबर सुरक्षाविषयक आराखड्यासंबंधी जारी काही निर्देशांचे उल्लंघन केले असल्याचे लक्षात आल्यावर एक कोटी रुपये दंड वसूल करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

नियमभंगाच्या प्रकरणात, अहमदाबादस्थित नूतन नागरिक सहकारी बँकेला ९० लाख रुपयांचा दंड, तर पुण्यातील डेम्लर फायनान्शियस सव्र्हिसेस इंडिया प्रा. लि. या बँकेतर वित्तीय कंपनीला १० लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश गुरुवारी रिझर्व्ह बँकेने दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Penal action against three banks including the reserve bank city union akp

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या