आज म्हणजेच मंगळवारी २८ सप्टेंबर २०२१ रोजी २२ दिवसांनंतर पेट्रोलचे तर सलग चौथ्या दिवशी डिझेच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे प्रतिलीटर मागे २० पैशांनी वाढवण्यात आलेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे २१ पैशांनी वाढलेत. मागील पाच दिवसांमध्ये डिझेलचे दर ९५ पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.

आजचे दर काय?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये आज मंगळवारी २२ दिवसांनंतर पहिल्यांदाच दरवाढ झाल्यावर पेट्रोलचे दर १०१.३९ रुपये प्रती लिटरवर इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये २५ पैशांची वाढ झाल्याने ते ८९.५७ रुपये प्रती लिटरवर पोहचले आहेत. मुंबईमध्येही प्रति लिटर पेट्रोलसाठी १०७.४७ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर मात्र शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

मागील चार दिवसात चार वेळा वाढले डिझेलचे दर
भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी, २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचे दर वाढवले होते. तर २७ सप्टेंबर रोजीही डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवण्यात आलेले. आज पुन्हा एकदा २५ पैशांनी दरवाढ करण्यात आलीय. पेट्रोलचे दर मागील २२ दिवसांपासून स्थीर होते मात्र आता ते सुद्धा वाढवण्यात आलेत.

चार मुख्य शहरांमधील पेट्रोल डिझेलचे प्रति लिटर दर खालीलप्रमाणे : –

दिल्ली – पेट्रोल १०१.३९ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.५७ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०७.४७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९७.२१ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल ९९.१५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.१७ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०१.८७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.६७ रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.