बॅंकेची कामे २९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, नाहीतर…

पुढील आठवड्यामध्ये सोमवार, २९ सप्टेंबरपूर्वी तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची बॅंकांची कामे मार्गी न लावल्यास तुम्हाला ७ ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे.

पुढील आठवड्यामध्ये सोमवार, २९ सप्टेंबरपूर्वी तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची बॅंकांची कामे मार्गी न लावल्यास तुम्हाला ७ ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे. येत्या ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी बॅंका अर्धवार्षिक कामकाजांमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे बॅंकाना आपल्या ग्राहकांना सामान्य सेवा पुरवता येणार नाहीत. २ ऑक्टेबरला गांधी जयंती, ३ ऑक्टोबरला दसरा आल्यामुळे बॅंकांना सुट्टी आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी शनिवार असल्याने सर्व बॅंका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ ऑक्टोबरला रविवार आल्याने आठवड्याची सुट्टी आहे.
यावर्षी बकरी ईद ५ ऑक्टोबरला आहे. मात्र, सरकारी अधिसूचनेनुसार दिनदर्शिकेत ६ ऑक्टोबरला बकरी ईद नमूद करण्यात आली असल्यामुळे बॅंकांना सोमवारी सुट्टी आहे. त्यानंतर मंगळवारी ७ तारखेला बॅंका नियमितपणे सुरू होतील. परंतु, इतक्या दिवसांची थकलेली कामे पूर्ण करण्यामध्ये कमीत कमी दोन दिवस जातील. सहाजिकच ७ आणि ८ ऑक्टोबरला बॅंकांमध्ये प्रचंड गर्दी उसळेल. त्यामुळे अतिमहत्त्वाची बॅंकांची कामे २९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली नाहीत, तर ७ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Please complete all bank transactions by 29th september

ताज्या बातम्या