पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतीय रिझर्व्ह बँकच्या दोन योजनांचं उद्घाटन केलं. भारतीय रिझव्ह बॅकेने रिटेल डायरेक्ट स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचं मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या वेळी मोदींनी करोनाच्या कालावधीमध्ये आरबीआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ग्राहकांसाठी महत्वाच्या असतील असं सांगण्यात येणाऱ्या या दोन योजनांचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर चिंतरंजन दास यांच्यासहीत इतर अधिकारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले.
“आज ज्या दोन योजनांचं उद्घाटन करण्यात आलं आहे त्या योजनांमुळे देशामध्ये गुंतवणूकीचा नक्कीच विस्तार होईल आणि कॅपिटल मार्केट्समध्ये सर्वसामान्यांना गुंतवणूक करणं अधिक सुरळीत होईल. या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिक सुविधा उपलब्ध होतील,” असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. रिटेल डायरेक्ट स्कीममुळे देशातील छोट्या गुंतवणूकादारांना सरकारी सिक्योरिटीजमध्ये (बॉण्ड्स) गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित आणि सहज शक्य होणार आहे.
नक्की पाहा >> क्रिप्टोकरन्सीसंदर्भात RBI च्या गव्हर्नरांकडून केंद्र आणि गुंतवणूकदारांना इशारा; म्हणाले, “अर्थव्यवस्था आणि..”
“करोनाच्या आव्हात्मक कालावधीमध्ये अर्थमंत्रालयाने, आरबीआय़ने आणि इतर वित्त संस्थांनी फारच कौतुकास्पद काम केलं,” असं म्हणत मोदींनी देशाची आर्थिक बाजू संभाळणाऱ्या संस्थांचं कौतुक केलं. तसेच आरबीआय देशाच्या अपेक्षांनुसार काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “मातील सहा सात वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्य भारतीयांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम केलं आहे,” असंही मोदी म्हणालेत. आरबीआयनेही केंद्राला सहकार्य करत सामान्यांच्या विचार करुन महत्वाचे निर्णय या कालावधी घेतल्याचंही मोदी म्हणाले.
नक्की वाचा >> पेट्रोलियम मंत्री सामान्य नागरिकप्रमाणे इंधन भरण्यासाठी पंपावर गेले; मात्र तिथे असं काही दिसलं की पेट्रोल पंपच सील करुन आले
“आतापर्यंत सरकारी सिक्युरीटी मार्केटमध्ये आपल्या देशातील मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांना सिक्योरिटीज गुंतवणूकीसाठी बँक विमा किंवा म्यूचुअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागायची. मात्र आता सुरक्षित गुंतवणूकीसाठी त्यांना एक सोपा पर्याय उपलब्ध झालाय. मागील सात वर्षांमध्ये बुडीत कर्जांची (एनपीए) प्रकरण पूर्ण पादर्शकतेने तपासण्यात आली. रिझोल्यूशन आणि रिकव्हरीवर विशेष लक्ष देण्यात आलं. सार्वजनिक क्षेत्रातील बँका रिकॅपिटलायझ करण्यात आला. आर्थिक रचना आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकानंतर एक अनेक लोकउपयोगी बदल करण्यात आले,” असं मोदी म्हणाले.
नक्की पाहा >> पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी नेपाळला जातायत UP, बिहारचे लोक; पाहा नेपाळमध्ये इंधन भरल्याने किती रुपयांचा होतोय फायदा
रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेमुळे ग्राहकांसाठीची तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि सोप्या पद्धतीने काम करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जातील. वित्तीय संस्था किंवा इतर तक्रारी आरबीआय़ पर्यंत पोहचवण्यासंदर्भातील माध्यम यामधून ग्राहकांना मिळणार आहे.