scorecardresearch

पूनावाला फिनकॉर्पला ३७५ कोटींचा नफा 

पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३७५.४ कोटी रुपये आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ११८.९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे.

पुणे : पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३७५.४ कोटी रुपये आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ११८.९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षांत ५५९ कोटी रुपयांचा आणि २०२०-२१ मधील चौथ्या तिमाहीत ६४७.७ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) मागील वर्षांच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढून १६,५७९ कोटी रुपयांवर गेली तर, वितरण मागील वर्षांच्या तुलनेत १५८ टक्क्यांनी वाढून ९,४९४ कोटी रुपयांवर गेले.

गृह वित्त क्षेत्रातील उपकंपनी पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने मार्च २०२२ अखेर ५,००० कोटी रुपयांच्या व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेचा टप्पा ओलांडला आहे. चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने भागधारकांना २० टक्के लाभांश घोषित केला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poonawala fincorp makes profit reported net profit ysh

ताज्या बातम्या