भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग..
* जागतिक वातावरणामुळे सध्या असलेला देशाचा ५ टक्के विकास दर हा निश्चितच निराशाजनक आहे. तो ८ टक्क्यांपर्यंत विस्तारित करण्यासाठी प्रसंगी निर्णायक पावले उचलली जातील.
* २०१६-१७ पर्यंत वित्तीय तुटीचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आणण्याचे सरकारेच उद्दीष्ट आहे. तर २०१३-१४ मध्ये चालू खात्यातील तूट आधीच्या ५ टक्क्यांवरून कमी होईल.

* खाजगी क्षेत्रातील कमी गुंतवणूक पाहता हे चित्र बदलले पाहिजे. तसेच थेट विदेशी गुंतवणुकीबाबत घेतलेल्या निर्णयांचा पुनर्विचार सुरू आहे. कोळसा आणि ऊर्जा क्षेत्राबाबतचे प्रलंबित निर्णय सुटण्याच्या दिशेने योग्य पावले पडत आहेत.
* इंधन निर्मिती क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गुंतवणुकीवरील मंत्रिमंडळ समितीद्वारे लवकरच आणखी उत्पादनासाठी मंजुरी दिली जाईल. तसेच या क्षेत्रात अधिक गुंतवणूक येईल.
* जमीन ताबा विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल.
* प्रशासन तळावरील भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे.
* आघाडी सरकार चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.