Premium

रुपयातील अस्थिरतेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन म्हणजे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ न देण्यावर कटाक्ष असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

as coin
प्रतिनिधिक छायाचित्र

पीटीआय, नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन म्हणजे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ न देण्यावर कटाक्ष असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पातळीवर दोलायमान परिस्थिती असतानादेखील अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गेल्या काही काळात रुपयाचे कमीत कमी अवमूल्यन झाले असल्याचे पात्रा यांनी नमूद केले. सध्या रुपया कुठल्या पातळीवर स्थिरावेल हे सांगणे कठीण असून अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हलादेखील डॉलरच्या पातळीबद्दल कोणताही अंदाज नाही. मात्र रुपयाच्या स्थिरतेसाठी आमचे प्रयत्न कायम आहेत. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कोणत्या पातळीवर स्थिर व्हावा हे निश्चित केले नसले तरी रुपयातील मोठी घसरण मध्यवर्ती बँकेला अमान्यच असेल, असे ते पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित ‘भूराजकीय चढ-उतार आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi focus rupee volatility deputy governor us dollars ysh

First published on: 25-06-2022 at 00:02 IST
Next Story
‘सेन्सेक्स’ची ४६२ अंशांनी कूच