असे असतील नवे व्याजदर, रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर

जीडीपी सहा टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज

चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी गुरुवारी रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर केलं. या पतधोरणात कर्जदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं अपेक्षेप्रमाणेच रेपो दर कायम ठेवला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागलं होतं. अखेर गुरूवारी रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर केलं. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.

या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली. किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयनं रेपो रेट ५.१५ टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदरानं कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.

२०२०-२१ या वर्षात जीडीपी ६ टक्के राहणार असल्याचं अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची अवस्था कुमकुवत असून, उत्पादनांना असलेली एकूण मागणी कमी राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rbi keeps repo rate unchanged at 5 15 bmh

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या