मुंबई : जवळपास महिनाभराच्या अंतराने कर्ज हप्तय़ांचा भार वाढविणाऱ्या व्याज दरवाढीचा आणखी एक धक्का कर्जदारांना सोसावा लागू शकतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) सोमवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीअंती आज, बुधवारी ‘रेपो दरा’त ४० आधार बिंदूंची (०.४० टक्क्यांची) सलग दुसरी वाढ केली जाईल, अशी शक्यता आह़े  याआधी ‘एमपीसी’ने मे महिन्याच्या सुरुवातीला तातडीने योजलेल्या बैठकीतून ‘रेपो दरा’त ४० आधार बिंदूंची (०.४० टक्क्यांची) वाढ करून तो ४.४० टक्के पातळीवर नेला होता. येत्या काळात महागाई दरात मोठय़ा प्रमाणात वाढीची शक्यता लक्षात घेऊन समितीने एकमताने कौल देत हा दरवाढीचा निर्णय घेतला होता.