एटीएममुळे रोख पैसे मिळवण्याचा मार्ग खूप सोयीस्कर बनला आहे. पण, जेव्हा एटीएम मशीनमधून पैसे मिळत नाही तेव्हा ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळ तर एटीएम या बंद असलेल्या अवस्थेत आढळून येतात. आता ही समस्या लवकरच सुटणार आहे कारण आरबीआयने एटीएम मशीनमधून पैसे न निघाल्यास बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे सामान्य लोकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरबीआयचा हा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू होईल. आरबीआयच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२१ पासून जर बँकेच्या एटीएममध्ये महिन्यात १० तास पैसे उपलब्ध नसेल तर त्या बँकेला दंड होऊ शकतो. आरबीआयने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, हा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून लोकांना एटीएमद्वारे पुरेशी रोकड मिळू शकेल.

“एटीएमद्वारे जनतेला पुरेशी रोकड उपलब्ध होईल याची खात्री करण्यासाठी, एटीएममध्ये पैसे पुन्हा न भरल्याबद्दल दंडाची योजना आखण्यात आली आहे,”असे आरबीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटा जारी करण्याचा आदेश आहे आणि बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटांचे वितरण करून हा आदेश पूर्ण करत आहेत.

यासंदर्भात, असे म्हटले आहे की, एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे झालेल्या डाउनटाइमचा आढावा घेण्यात आला आणि असे दिसून आले की एटीएममधील कॅश-आउटमुळे रोख रक्कम उपलब्ध होत नाही आणि जनतेच्या टाळता येण्यासारख्या गैरसोयी होतात. त्यामुळे, बँका/ व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) एटीएममध्ये रोख उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रोख रक्कम टाळण्यासाठी वेळेवर भरपाई सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या प्रणाली/ यंत्रणा मजबूत करतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

“या संदर्भात कोणतेही पालन न केल्यास याकडे गंभीरतेने पाहिले जाईल आणि ‘एटीएममध्ये पैसे पुन्हा न भरल्याबद्दल दंडाच्या योजनेत’ निर्धारित केल्यानुसार आर्थिक दंड आकारला जाईल,” असे आरबीआयने म्हटले आहे. ही योजना १ ऑक्टोबर पासून लागू होईल. जून २०२१ च्या अखेरीस देशात वेगवेगळ्या बँकांचे २,१२,७६६ एटीएम आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi penalise banks non availability cash atms abn
First published on: 11-08-2021 at 10:28 IST