scorecardresearch

Reliance Jio : एलवायएफ ४जी स्मार्टफोनच्या विक्रीस सुरुवात, तीन महिन्यांसाठी फ्री अनलिमिटेड डेटा

सामान्य ग्राहकदेखील ४जी नेटवर्कचा वापर करू शकतील.

Reliance Jio : एलवायएफ ४जी स्मार्टफोनच्या विक्रीस सुरुवात, तीन महिन्यांसाठी फ्री अनलिमिटेड डेटा
रिलायन्सने एलवायएफ या आपल्या स्मार्टफोनसोबत सिम कार्डची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

रिलायन्स जियोने लाइफ या त्यांच्या स्मार्टफोनसोबत सिमकार्ड देण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सची ही सुविधा सामान्य ग्राहकांना लक्षात ठेऊन आखण्यात आल्याने आता सामान्य ग्राहकदेखील ४जी नेटवर्कचा वापर करू शकतील. गत वर्षी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू केली होती. रिलायन्स जियो सिमकार्डासोबत तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड मोफत इंटरनेट आणि ४५०० कॉल टाइम देण्यात येत आहे. असे असले तरी या वर्षाच्या अखेरीस जियो पूर्णपणे लॉन्च करण्यात येईल, असे जाणकारांचे मत आहे.
रिलायन्सने jio.com या त्यांच्या संकेतस्थळाचेदेखील अनावरण केले असून, या संकेतस्थळावरून वापरकर्ता कनेक्शनसाठी नोंदणी करू शकतो. याबरोबरच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ओळखीतून सिमकार्ड मिळणारी याआधीची योजनादेखील कंपनीतर्फे बंद करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीने सहा महिन्यांपूर्वी २३०० मेगाहर्टजचा ४जी स्पेक्ट्रम खरेदी केला होता. नंतर ८०० आणि १८०० मेगाहर्टज बँडचादेखील खरेदी केला होता. जियोने अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनबरोबरदेखील करार केला आहे. जियो सिमची रिलायन्स डिजीटल स्टोअर आणि अन्य मोठ्या रिटेल स्टोअर्समधून विक्री करण्यात येत आहे.
रिलायन्स जियोच्या आगमनाने ४जी डेटाच्या किंमतीत युद्ध छेडले जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियानेदेखील आपली ४जी सुविधा सुरू केली आहे. इंटरनेटच्या सध्या उपलब्ध असलेल्या वेगापेक्षा रिलायन्स जियोचा वेग ८० पट अधिक असल्याचे जियोच्या अनावरण प्रसंगी मुकेश अंबानी यांनी सांगितले होते. त्याचबरोबर जियो इंटरनेट सेवेचा दरदेखील कमी असेल असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2016 at 14:31 IST

संबंधित बातम्या