किरकोळ महागाई दरात पुन्हा एकदा वाढ नोंदली गेली आहे. मेमधील हा दर ५.०१ टक्क्य़ांवर गेला आहे. आधीच्या महिन्यात हा दर ५ टक्क्य़ांखाली ४.८७ टक्के होते. डाळी तसेच भाज्या तसेच फळांचे दर वाढल्याने यंदा महागाई वाढल्याचे मानले जात आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित मे २०१४ मध्ये ८.३३ टक्के होता. मेमध्ये मात्र डाळींच्या किमती १६.६२ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत नियमित पुरवठय़ासाठी डाळींच्या आयातीस सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या खरीप हंगामात डाळ उत्पादन २० लाख टनने कमी झाले होते.
मेमध्ये फळे आणि भाज्यांच्या किमती अनुक्रमे ३.८४ व ४.६४ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर दूध व अन्य पदार्थही ७.४३ टक्क्य़ांनी महाग झाले आहेत. एकूण अन्नधान्य महागाई दर मात्र एप्रिलमधील ५.११ वरून मे २०१५ मध्ये ४.८ टक्क्य़ांवर आला आहे.