मुंबई : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझव्‍‌र्ह बँकेने ५,११५ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे रविवारी जाहीर केले. सहा वर्षांपूर्वी रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर ५७ टक्के अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुवर्ण रोख्यांचा विमोचन दर हा सरलेल्या ९ मे ते १३ मे २०२२ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनात कपात केली जाऊ शकेल, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली गेली. १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम विक्री करण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांची विक्री २,९५७ रुपये प्रतिग्रॅम अशी होती. त्या तुलनेत विमोचनासाठी निर्धारित  ५,११५ रुपये प्रतिग्रॅम हा दर ५७ टक्के परतावा मिळवून देणारा आहे. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा असून, पाच वर्षांनंतर यातील गुंतवणूक मुदतपूर्व काढण्याची मुभा दिली गेली आहे. सरकारची सार्वभौम हमी असणारे हे सुवर्ण रोखे हे रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे विक्री केले जातात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return gold bonds central government sovereign gold bond scheme ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST