नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या महिन्यापासून लादलेल्या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल वितरण कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर अर्थात ‘विंडफॉल’ कर-भारात गुरुवारी पुन्हा एकदा फेरबदलाची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतर्गत उत्पादित खनिज तेलावरील उपकरात कपात करण्यात आली आहे. तो आता १७,७५० रुपयांवरून १३,०० रुपये प्रति टन करण्यात आला. त्यामुळे ओएनजीसी आणि वेदान्त लिमिटेडसारख्या तेल उत्पादकांना दिलासा मिळेल. मात्र गेल्या वेळेस विमान इंधनाच्या  निर्यातीवरील कर रद्द करण्यात आला होता. आता मात्र एटीएफ निर्यातीवर पुन्हा प्रति लिटर २ रुपये कर लादला आहे. त्याचबरोबर डिझेलवरील कर २ रुपयांनी वाढवून ७ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने १ जुलैला पेट्रोल आणि विमानाचे इंधन अर्थात एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर ६ रुपये आणि डिझेलच्या निर्यातीवर १३ रुपये प्रति लिटर निर्यात कर लावण्यात आला.  २० जुलैला आढावा बैठकीत पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर ६ रुपये आकारण्यात येणारे निर्यात शुल्क पूर्णपणे रद्दबातल करण्यात आले, तर डिझेल आणि एटीएफ निर्यातीवरील कर प्रति लिटर २ रुपयांनी कमी करण्यात आला. २ ऑगस्टच्या दुसऱ्या बैठकीतही डिझेल निर्यातीवरील करात प्रति लिटर ६ रुपयांची कपात करून, तो ११ रुपये प्रति लिटरवरून ५ रुपये प्रति लिटर करण्यात आला, तर एटीएफ निर्यातीवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revised windfall tax duty diesel atf exports increased ysh
First published on: 19-08-2022 at 01:22 IST