मुंबई : डॉलरच्या तुलनेत सलगपणे घसरण नोंदविणाऱ्या रुपयाने मंगळवारी एकाच व्यवहारात आणखी ४१ पैशांची आपटी नोंदविली. डॉलरसमोर मोठय़ा फरकाने कमकुवत होत स्थानिक चलन आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ७९.३६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावले. जागतिक पातळीवर इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत प्रबळ होणारा डॉलर, देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती याच्या एकंदर परिणामी रुपयाने डॉलरपुढे नांगी टाकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारच्या घसरणरोधी उपाययोजना आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाने गेले काही दिवस सलगपणे नवनवीन नीचांक गाठणारी मालिका कायम राखली आहे. सोमवारी ७८.९५ वर बंद झालेल्या रुपयाने मंगळवारच्या सत्राची सुरुवात ७९.०४ या नरमाईनेच केली. सत्रात चलन ७९.०२ पर्यंतच मूल्यवृद्धी शकले, तर व्यवहारादरम्यान त्याचा ७९.३८ हा ऐतिहासिक तळ राहिला. रुपयाच्या घसरणीची वाढलेली तीव्रता पाहता, त्याने प्रति डॉलर ८० ची वेस ओलांडण्याचे अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलेले भाकीत प्रत्यक्षात फार दूर नसल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee fall continues india rupee falls to record low zws
First published on: 06-07-2022 at 01:38 IST