डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी पुन्हा उंचावला. २८ पैशांच्या वधारणेसह स्थानिक चलन ६०.६५ वर पोहोचले. सलग सहाव्या आठवडय़ात चलन भक्कम बनले आहे. महिन्यातील सर्वोच्च झेप घेत रुपया शुक्रवारी ०.४६ टक्क्यांनी वधारला. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी रुपयाने ४५ पैशांची वाढ एकाच दिवशी नोंदविली होती. चलनाची शुक्रवारच्या सत्राची सुरुवात ६०.९७ या किमान पातळीवर सुरू झाली. यानंतर तो ६१ च्याही खाली उतरत ६१.०३ पर्यंत गेला, तर व्यवहारातील त्याचा वरचा स्तर ६०.६४ राहिला. सलग दुसऱ्या दिवशी रुपया वधारला आहे. चलन गुरुवारी २ पैशांनी वधारले होते. तत्पूर्वी दोन व्यवहारांतील त्यातील घट ६१ पैशांची राहिली आहे.