मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून मंगळवारच्या सत्रात रुपयाने ४६ पैसे मूल्य गमावून ७८.८३ अशा नवीन नीचांकी पातळीवर लोळण घेतली. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर गेल्या काही महिन्यांपासून ११० ते १२० डॉलर प्रति पिंपाच्या पातळीवर कायम आहेत. देशातील ८० टक्के तेलाची गरज खनिज तेलाच्या आयातीतून भागवली जाते. यामुळे तेल आयातदार कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणावर वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा ताण रुपयाच्या मूल्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. याचबरोबर भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे मोठय़ा प्रमाणावर निर्गमन सुरू असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची पीछेहाट कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरबँक परकीय चलन बाजारात मंगळवारच्या सत्रात रुपयाने ७८.५३ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात रुपयातील घसरण अधिक वाढल्याने रुपयाने ७८.८५ या  ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. त्यानंतर दिवसअखेर ४६ पैशांनी घसरण ७८.८३ पातळीवर स्थिरावला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन म्हणजे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ न देण्यावर कटाक्ष असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते. मात्र तरीही मंगळवारच्या सत्रात रुपयात डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee to new lows dollars rs falling globally ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST