स्मार्टफोन अन् कॅमेऱ्याचा अलौकिक मिलाफ

सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोन मालिकेने बाजारात धमाका उडविल्यानंतर कंपनीने मंगळवारी गॅलेक्सी एस फोर मालिकेमध्ये मिनी आणि झूम असे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत आणले. यातील एसफोर झूममध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट कॅमेऱ्याच्या मिलाफ साधण्यात आला आहे. १६ मेगापिक्सेलसह तब्बल १० एक्स ऑप्टिकल झूम हे या स्मार्टफोन कॅमेऱ्याचे वैशिष्टय़ आहे.

सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोन मालिकेने बाजारात धमाका उडविल्यानंतर कंपनीने मंगळवारी गॅलेक्सी एस फोर मालिकेमध्ये मिनी आणि झूम असे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत आणले. यातील एसफोर झूममध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट कॅमेऱ्याच्या मिलाफ साधण्यात आला आहे. १६ मेगापिक्सेलसह तब्बल १० एक्स ऑप्टिकल झूम हे या स्मार्टफोन कॅमेऱ्याचे वैशिष्टय़ आहे.
सॅमसंग मोबाईलचे संचालक मनू शर्मा यांनी ही घोषणा केली. त्यावेळेस ते म्हणाले की, सॅमसंगची गॅलेक्सी मालिका आता या दोन्ही स्मार्टफोन्समुळे परिपूर्ण झाली आहे. संवाद हा काही आता केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो दृश्यसंवाद झाला आहे. म्हणूनच डिजिटल कॅमेऱ्याची स्मार्ट फीचर्स या गॅलेक्सी एसफोर झूममध्ये एकत्र करण्यात आली आहेत. या स्मार्टफोनला मागच्या बाजूस डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोठय़ा आकाराची लेन्स आहे. कॅमेऱ्यासाठी झूम रिंग नावाचे एक फीचर देण्यात आले असून त्या फीचर मार्फत संपूर्ण कॅमेरा त्यातील बारिकसारीक सेटिंग्जसह वापरता येतो. शिवाय टिपलेला फोटो लगेचच एमएमएसद्वारे शेअर करण्याची सोयही याला आहे. हा स्मार्टफोन आणि त्यातील कॅमेरा अँड्रॉइडच्या जेली बीन या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो, याची भारतीय बाजारपेठेतील किंमत २९,९००रुपये आहे.
सॅमसंगने बाजारपेठेत आणलेले दुसरे मॉडेल गॅलेक्सी एसफोर मिनी ४.२७ इंचाचा क्यूएचडी स्क्रीन असलेले आहे. ते वजनानेही अतिशय हलके आहे. त्यात वापरलेल्या १.७ गिगाहर्टझ् वेगाच्या डय़ुएल कोअर प्रोसेसरमुळे हा स्मार्टफोन अतिशय वेगात काम करतो. याला मागच्या बाजूस ८ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस १.९ मेगापिक्सेल एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत २७,९०० रुपये आहे. सॅमसंगने बाजारात आणलेल्या स्मार्टफोन्सची संख्या एकूण १४च्या घरात पोहोचली असून रु. ५,२४० ते रु. ४०,३०० पर्यंत उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samsung galaxy s4 zoom launched in india at rs

ताज्या बातम्या