अल्पबचत योजनांचे व्याज दर घसरत असताना

म्युच्युअल फंडांमध्येही बचत खात्यासारखी वैशिष्टय़े असणारी तरल आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध केले आहेत. किंबहुना या पर्यायांनी गुंतवणूकदाराला बचत खाते आणि मुदत ठेवीच्या तुलनेत जादा परतावा दिला आहे. फंड घराण्यांकडून उपलब्ध सेव्हिंग्ज फंड योजनांनी ही किमया निश्चित साधली आहे.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

व्याजाचे दर झपाटय़ाने खाली येत आहेत. अशा स्थितीत स्थिर उत्पन्न प्राप्तीसाठी म्युच्युअल फंड हा नवा पर्याय गुंतवणूकदारांनी आजमावून पाहायला हवा, असे गुंतवणूक सल्लागारांचेही मत आहे. सेव्हिंग्ज फंडांचे तज्ज्ञ निधी व्यवस्थापक संशोधनावर भर देत फंडांनी गोळा केलेला निधी कॉर्पोरेट बाँडमध्ये आणि अन्य सुरक्षित रोखे पर्यायांमध्ये गुंतवितात. कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीत सुधारणेच्या शक्यतेने त्या कंपन्यांच्या रोख्यांची पतधारणाही वाढून ही गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. परिणामी यातून गुंतवणूकदारांना नियमित व सरस परतावा मिळत आहे.

सेव्हिंग्ज फंडांची कामगिरी बँकांतील मुदत ठेवींच्या तुलनेत वरचढ ठरली असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला असल्याचे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शहा यांनी सांगितले. मार्च २०१६ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग्ज फंडात एक लाखाची गुंतवणूक करणाऱ्यांना एप्रिल २०१७ अखेर करवजावटीनंतर १ लाख २७ हजार २१९ रुपयांपर्यंत गुंतवणूक मूल्य झाले आहे. तर पारंपरिक योजनांमधून याच कालावधीत एक लाख रुपयांचे एप्रिलअखेर गुंतवणूक मूल्य १,१४,३६९ रुपये असे वाढले असते. हे ओळखून गुंतवणूकदार सेव्हिंग्ज फंडांकडे वळत असल्याचा शहा यांनी दावा केला.

गेल्या काही महिन्यांत सेव्हिंग्ज फंडातील गुंतवणूक वाढली आहे. अल्पबचतीचे व्याजदर कमी होत असताना सेव्हिंग्ज फंडांच्या दमदार कामगिरीने गुंतवणूकदार सुखावला आहे.

गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा मिळण्यासाठी या फंडाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले जाते तो फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग्ज फंड होय. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग्ज फंडाचा विचार करता या फंडाने सातत्याने वेगवेगळ्या स्थितीचा विचार करता गुंतवणूकदारांना समाधानकारक परतावा दिला आहे.

फंडातून एक वर्षांसाठी १० टक्के, तीन वर्षांच्या कालावधीत ९.५ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत ९.२ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत बँक ठेवी, पोस्टाच्या योजना या सारख्या पारंपरिक पर्यायांनी एक वर्षांसाठी ७ टक्के, तीन वर्षांसाठी ८.७५ टक्के आणि पाच वर्षांसाठी ९.२५ टक्के परतावा दिला आहे.