नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने कर्जावरील व्याजाचे दर वाढवण्याची घोषणा सोमवारी केली. एमसीएलआर आणि रेपो दरासारख्या बाह्य मानदंडावर आधारित (ईबीएलआर) मधील वाढीनुसार कर्जे महागणार आहेत. त्यामुळे नवीन तसेच विद्यमान अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना याचा फटका बसणार आहे. याचबरोबर बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना दिलासादेखील दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ०.२० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर आता ७.५० टक्क्यांवरून वाढून ७.७० गेला आहे. याचप्रमाणे एक महिना, तीन महिने ते सहा महिने मुदतीच्या कर्ज व्याजदरात आता ७.३५ ते ७.६५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर तीन वर्षे मुदतीच्या कर्जाचा दर ८ टक्क्यांवर गेला आहे. स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांत कर्जाच्या दरात ०.६० टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच बँकेने २०१९ पासून कर्जासाठी रेपो दराशी संलग्न ‘ईबीएलआर’ आधारित व्याजदराची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली आहे. या ‘ईबीएलआर’ आधारित दरामध्ये देखील ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आधार दराने (बेस रेट) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या कर्जाच्या हप्तय़ात देखील वाढ होणार आहे. हा दर मुख्यत्वे रिझव्‍‌र्ह  बँकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार परिवर्तित होतात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi hikes lending rates on loans from today zws
First published on: 16-08-2022 at 01:54 IST