भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असेल्या स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गुंतवणूकदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीवर (FD) अधिक लाभ मिळणार आहे. स्टेट बँकने आपल्या ठराविक एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नियमित ग्राहकांसाठी मोठ्या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक ३टक्क्यांपासून सुरू होतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रारंभिक व्याज दर ३.५० टक्के आहे. बल्क टर्म डिपॉझिटमध्य खातेदार ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीच्या ठेवी ठेवू शकतात. नवीन दर नवीन एफडी आणि परिपक्व झालेल्या जुन्या एफडीच्या नूतनीकरणावर लागू होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एफडीवरील व्याजदरातील वाढ २ कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या ठेवींवर करण्यात आली आहे. २ कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल नाही. देशांतर्गत मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील नवीन एफडी दर १५ डिसेंबर २०२१ पासून लागू झाले आहेत. बँकेने एफडी दरात १० बेसिस पॉइंट्स (०.१० टक्के) वाढ केली आहे.

( हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत किंचित वाढ, चांदीच्या दर वाढले; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव )

SBI ने २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD चे व्याजदर कायम ठेवले आहेत.

( हे ही वाचा: Petrol- Diesel Price Today: आजही महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर शंभरी पार, डिझेलचे भाव झाले कमी; जाणून घ्या इंधनाचे दर)

८ डिसेंबर २०२१ रोजी, RBI ने दरांवर यथास्थिती ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर सध्या अनुक्रमे ४% आणि ३.३५ टक्के आहेत. RBI ने सलग नवव्या पतधोरण आढावा बैठकीत प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. सध्याचा ४% चा रेपो दर एप्रिल २००१ नंतरचा सर्वात कमी आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi raises interest rates on its fixed fds find out ttg
First published on: 17-12-2021 at 11:32 IST