मुंबई : भांडवली बाजार नियत्रंक सेबीने ‘डार्क फायबर’प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सल्लागार आनंद सुब्रमणियम यांच्यासह १८ दलाली पेढय़ा आणि संस्थांना मंगळवारी उशिरा एकूण ४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेबीने मंगळवारी पारित केलेल्या आदेशानुसार, दोषींना ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. एनएसईसह त्यांच्या माजी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सेबीने, वे टू वेल्थ ब्रोकर्स आणि जीकेएन सिक्युरिटीज, संपर्क इन्फोटेन्मेंट आणि त्यांचे संबंधित कर्मचारी यांनादेखील दंड ठोठावण्यात आला आहे.

 राष्ट्रीय शेअर बाजाराला ७ कोटी, एनएसईचे व्यवसाय विकास अधिकारी रवी वाराणसी, चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमणियम यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये, तर वे टू वेल्थ ब्रोकर्सला ६ कोटी, जीकेएन सिक्युरिटीज ५ कोटी रुपये आणि संपर्क इन्फोटेनमेंटला ३ कोटी रुपयांचा दंड भरण्यास सेबीने फर्मावले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi fines including nse chitra ramakrishna dark fiber case ysh
First published on: 30-06-2022 at 00:26 IST