मुंबई : जागतिक पातळीवर सकारात्मक कलानंतरही देशांतर्गत गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि तंत्रज्ञानासंबंधित समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ३९० अंशांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा होत असलेली वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीच्या माऱ्याने घसरणीस हातभार लावला.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३८९.०१ अंशांची घसरण झाली आणि तो ६२,१८१.६७ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने मजबूत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात करत ६२,७३५.४२ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र दुपारच्या सत्रात झालेल्या नफावसुलीमुळे सेन्सेक्स ६२ हजारांची पातळी मोडत ६१,८८९.११ या सत्रातील नीचांकी पातळीवर पोहोचला.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

संभाव्य जागतिक मंदीची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला झळ पोहोचेल या धसक्याने या कंपन्यांच्या समभागात मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली. गेल्या काही सत्रांत तेजीत असलेल्या बँकिंग क्षेत्रानेदेखील बाजारावरील पकड गमावली. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून येत्या आठवडय़ात व्याजदरात अध्र्या टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आधीपेक्षा संभाव्य वाढ सौम्य राहण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात तेजीचे वातावरण होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेकच्या समभागात सर्वाधिक ६.७२ टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ टेक मिहद्र, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे नेस्ले इंडिया, टायटन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, इंडसइंड बँक आणि आयटीसी या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान, धातू आणि तंत्रज्ञान निर्देशांकात प्रत्येकी २.९८ टक्कयांपर्यंत घसरण झाली. तर आरोग्य निगा निर्देशांक आणि बँकेक्स तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी १,१३१.६७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.