मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या प्रभावामुळे गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, वाहन निर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टीने नकारात्मक पातळीत प्रवेश केला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८९.१४ अशांच्या घसरणीसह ५७,५९५.६८ अंशांच्या घसरणीसह बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२.९० अंशांची घसरण झाली. तो १७,२२२.७५ पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर २२ कंपन्यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.

sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून सुरू झालेला निधीचा प्रवाह, वाढत्या इंधनाच्या किमती आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हचे आगामी बैठकीत व्याजदरासंबधीच्या धोरणामुळे बाजारात अस्थिरता कायम आहे. परिणामी सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजाराला निश्चित दिशा प्राप्त होऊ शकलेली नाही, असे मत जिओजित फायनान्शिअलचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकर व्हीके विजयकुमार यांनी नोंदले.

सेन्सेक्समध्ये कोटक मिहद्र बँक (३.०९ टक्के), टायटन (२.६३ टक्के), एचडीएफसी बँक (२.२३ टक्के), आयसीआयसीआय बँक (१.९४ टक्के), एचडीएफसी (१.५ टक्के), मिहद्र अँड मिहद्र (१.३१ टक्के) आणि मारुती सुझुकीच्या (१.१७ टक्के) समभागात घसरण झाली. या उलट, डॉ. रेड्डीज लॅब (४.९ टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (१.७७ टक्के) आणि टेक मिहद्रचे (१.७५ टक्के) समभाग तेजी दर्शवीत होते.