scorecardresearch

सेन्सेक्समध्ये १५३ अंशांची घसरण

भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिली. सोमवारच्या मोठय़ा निर्देशांक आपटीनंतर मंगळवारच्या व्यवहारात काही काळ सकारात्मक पातळीत प्रवेश करणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी सत्रअखेर मात्र घसरणीसहच केली.

sensex
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिली. सोमवारच्या मोठय़ा निर्देशांक आपटीनंतर मंगळवारच्या व्यवहारात काही काळ सकारात्मक पातळीत प्रवेश करणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी सत्रअखेर मात्र घसरणीसहच केली. जागतिक पातळीवरील प्रतिकूल संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सोमवारी झालेल्या घसरणीच्या धक्क्यातून गुंतवणूकदार सावरलेले नाहीत.

दिवसअखेर सेन्सेक्स १५३.१३ अंशांच्या घसरणीसह ५२,६९३.५७ पातळीवर बंद झाला. ही निर्देशांकाची दहा महिन्यांतील (३० जून २०२१) नीचांकी पातळी आहे. तर निफ्टीमध्ये ४२.३० अंशांची घसरण झाली आणि तो १५,७३२.१० पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक २.१२ टक्क्यांनी घसरण झाली. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, एचडीएफसी, एशियन पेंट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे, भारती एअरटेल, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, डॉ रेड्डीज आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग प्रत्येकी १.६१ टक्क्यांपर्यंत वधारले.

किरकोळ महागाई दर एप्रिलमधील ७.७९ टक्के या आठ वर्षांतील उच्चांकी पातळीवरून कमी होत सरलेल्या मे महिन्यात ७.०४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने सोमवारच्या सत्रातील घसरणीतून सावरत गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचे अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण समितीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे, असे निरीक्षण जिओजित फायनानन्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी नोंदवले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-06-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या