‘सेन्सेक्स’ची त्रिशतकी आपटी; १० महिन्यातील मोठी घसरण

बिकट अर्थव्यवस्थेचा सामना करण्यासाठी आठवडय़ावर आलेल्या अर्थसंकल्पात वाढीव कराचा मार्ग चोखाळण्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात आज थरकाप उडवून दिला. या भीतीपोटीच गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ एकाच सत्रात ३०० हून अधिक अंशांनी आपटला. १९,३२५ पर्यंत खाली येताना त्याने २०१३ मधील आतापर्यंतच्या नीचांकासह गेल्या नऊ महिन्यातील एकाच दिवसातील सर्वात मोठी घट नोंदविली.

बिकट अर्थव्यवस्थेचा सामना करण्यासाठी आठवडय़ावर आलेल्या अर्थसंकल्पात वाढीव कराचा मार्ग चोखाळण्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात आज थरकाप उडवून दिला. या भीतीपोटीच गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ एकाच सत्रात ३०० हून अधिक अंशांनी आपटला. १९,३२५ पर्यंत खाली येताना त्याने २०१३ मधील आतापर्यंतच्या नीचांकासह गेल्या नऊ महिन्यातील एकाच दिवसातील सर्वात मोठी घट नोंदविली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’देखील जवळपास शतकी घसरणीने ५,९०० या  भावनिक पातळीच्याही खाली आला.
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या गुरुवारी संसदेत सादर होणार आहे. सरकारसाठी डोकेदुखी ठरलेली वित्तीय तूट रोखण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे करांचा मोठा बोजा लादण्याची धास्ती वाढत आहे. यामुळे भांडवली बाजारात आज एकाच सत्रात जवळपास सर्वच निर्देशांक तसेच आघाडीच्या समभागांचे भाव झपाटय़ाने आपटले. युरोपीय निर्देशांकातील घसरणीने हा वेग आणखी तीव्र बनविला.
गुंतवणूकदारांच्या या भूमिकेला अमेरिकेतील फेडरल रिझव्र्हचेही सहाय्य लाभले. बिकट स्थिती पाहता तेथील मध्यवर्ती बँकेनेही अधिक नरमाई व शिथिलतेची धोरणे शक्य नसल्याचे सांगत हात वर केल्याने युरोपीय देशांमधील प्रमुख निर्देशांकही कोसळले होते. १९,५४९ वर व्यवहाराची सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक तासाभरतातच १९,५५४ पर्यंत गेला. मात्र यानंतर आशियाई तसेच पाश्चिमात्य शेअर बाजारातील नकारात्मक प्रवासाला त्याने साथ देत १९,२८९ पर्यंत घसरण राखली. हे दोन्ही टप्पे बाजारासाठी दिवसातील अनुक्रमे उच्चांकी व नीचांक ठरले. बाजार अखेर १९,३२५.३६ वर बंद झाला. ‘सेन्सेक्स’मध्ये ३० पैकी केवळ गेल या सार्वजनिक क्षेत्रातील वायू कंपनीचा समभाग चढा राहिला. ०.०९ टक्के वाढीसह या समभागाचे मूल्य ३३८.१० वर रुपयांवर स्थिरावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex falls over 300 points

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या